कधी कधी स्वतःचा झगडा
स्वतःशीच असतो
सगळेच कोपरे मनाचे
नसतात उजळायचे
कधी कधी मौनातही
सापडते शांतता
विड्राॅवल हाच मार्ग
सोपा वाटत आलाय मला
प्रत्येक आनंद माझा असावा
हा अट्टाहास कधीच नव्हता
कधी कधी वाट पाहणंही
सोपं वाटलं मला
तर कधी आनंदातून
बाहेर पडायची घाई
समजतेय मीच मला अजून
शांत होतेय वावटळ आतली.
-मृणाल
सुंदर काव्य.
LikeLiked by 1 person