कधी डोकावून पहावसं वाटतं मनात. खूप खोल. शांत बसावं…विसरून सगळा कोलाहल आजूबाजूचा. ऐकावा फक्त आवाज आपला…आतला !!
सहज नाही जमलं..पण जमतच जातं…खिडक्या बंद करून घेणं मनाच्या…पुसट होत जातो मग आवाज आजूबाजूचा…ऐकू येतो फ़क़्त आवाज आपला…आतला !!
सहज नाही जमलं…पण जमतच जातं …कोलाहलात असून मग्न होणं…गर्दीत असून एकट राहण…
आवडू लागतो मग …आवाज आपला…आतला !!
-मृणाल
स्वत साठी रोज थोडा वेळ जरूर काढावा, नाही तर जगण्याच्या शर्यतीत आपण फक्त स्वतालाच हरवतो.
Like