रोजच अनुभवते पण तरी नवीन….किती रुपांमध्ये जगण्याचं अनोखं गिफ्ट..प्रत्येक जन्मात स्त्रीच व्हायला आवडेल मला!
कधी मी दुर्गा कधी भवानी
कधी पार्वती कधी मोहिनी
कधी चंचला कधी भामिनी
कधी जिजाऊ कधी हिरकणी
कधी जनाई कधी माऊली
कधी पांघरुण कधी सावली
कधी मी राधा कधी मी मीरा
कधी नाव मी कधी किनारा
किती रुपांतून माझे स्त्रीपण
कधी प्रतिबिंब तर कधी मी दर्पण!!
-मृणाल
खूप सहज आणि सुंदर भावना व्यक्त केल्यास मृणाल!
LikeLike